जनआधार फाऊंडेशनकडुन मोफत लसीकरण शिबीरात 204 नागरीकांनी लाभ
सोलापूर प्रतिनिधी : प्रभाग क्र 8 मधील विणकर बागे समोर साखर पेठ परीसरातील नागरीकांना लसीकरण मिळावे व अनेक नागरीकांनी पहिला डोस गेतला नव्हता अश्यांना पहिला डोस व दुसरा डोस देण्यात आले हे शिबीर सलग तीन दिवशीय शिबीर जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने ठेवण्यात आले त्यावेळी 204 नागरीकांनी लाभ घेतला व लसीकरण हे घेतलच पाहिजे सध्या कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता आहे असेही गोसकी यांच्या कडुन सांगण्यात आले. त्यावेळी जनआधार फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद गोसकी यांनी नागरीकांचे आभार प्रकट केले उपस्थित जनआधार फाऊंडेशनचे महेश दासी शुभम मिठ्ठा आकाश बुर्ला लोकेश आंबट श्रीकांत शिंदे पवन गोसकी विराज वग्गा वेणुगोपाल सामल अंबादास दुर्गम मोहन पेगड्याल दत्ता येलुर चंदन पेगड्याल विनायक आंबट राहुल रासकोंडा अन्य परीसरातील सर्व नागरीक मोठ्या संख्याने उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसकी यांच्या सामाजिक कार्याचे नागरीकांनी कौतुक केले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८