राज्याचे मुख्य सचिव म्हणून मनु कुमार श्रीवास्तव नियुक्त

मुंबई 
प्रतिनिधी
  : राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. चक्रवर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीवास्तव यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.मनु कुमार श्रीवास्तव यांचा
जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला आहे. मूळचे लखनौ येथील श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

    श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी नागपूर जिल्हाधिकारी नागपूर महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

    यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८