ॲड. ठाकूर म्हणाल्या जियाला ऑटिझम आहे, तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या जियाने आज हा विश्वविक्रम केला आहे. पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे, हे न पाहता ते काय करू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. जियाच्या या यशात तिच्या पालकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जियाला भविष्यात जी काही मदत लागेल त्याबाबत शासन म्हणून आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी असू असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.या सत्कार समारंभास जियाचे वडील मदन राय आणि आई रचना राय उपस्थित होते.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८