पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने घेतला पुढाकार !
यावर्षी महापालिका मुख्यालयातील श्री गणेश उत्सवाचे हे 73 वे वर्ष आहे.
आत्तापर्यंत महानगरपालिकेत माघी गणेश उत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या दोन मूर्ती (एक मोठी मूर्ती व पूजेची छोटी मूर्ती) आणल्या जात होत्या परंतु यावर्षी घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ.रामदास कोकरे यांनी आचार्य अत्रे रगमंदिरात मूर्तिकार मूर्तीविक्रेते आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांनी मूर्ती बनविताना पीओपीचा वापर टाळण्यासंदर्भात आवाहन केले होते त्या अनुषंगाने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याच्या दृष्टीने घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ.रामदास कोकरे व पर्यावरण व प्रदूषण विभागचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महापालिका मुख्यालयात यावर्षी शाडूच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना अत्यंत साध्या रीतीने कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून केले जाईल अशी माहिती यावर्षीच्या माघी गणेशोत्सवाचे अध्यक्ष अश्विन बडवणे प्रमुख मार्गदर्शक अजय पवार व कार्याध्यक्ष संजय बंधाटे खजिनदार सचिन चव्हाण यांनी दिली आहे.