* एसी लोकलचे तिकीटाचे दर झाले कमी पण...
मुंबई प्रतिनिधी : मुंबईत झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे कमी केले आहेत. तब्बल ५० टक्क्यांनी दर कमी करत असल्याचे दानवे यांनी जाहीर केले आहेत.त्यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील एका प्रवाशाला १३० रुपये मोजावे लागत होते. आता ९० रुपयांचे तिकीट आकारले जाणार आहे.
चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे. आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत. तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी केले आहेत. याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र जाहीर केले आहे. दैनंदिन पास किंवा मासिक पासबाबत मात्र कोणतीही घोषणा केलेली नाही.एसी लोकलच्या अत्यंत मर्यादीत फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. एसी लोकलचे तिकीटाचे आणि दैनंदिन पासचे दर हे अव्वाच्या सव्वा असल्याने या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. पश्चिम मध्य, हार्बर ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून जवळपास ९० लाखापर्यंत लोक हे दररोज लोकलने प्रवास करतात.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८