मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची केंद्रीय सचिवपदी बढती !!
इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. चहल हे यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. तसेच जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. चहल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही त्यांनी काम केले असून, औरंगाबाद आणि ठाण्याचे जिल्हाधिकारीही होते.
केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्ये सोपवली होती. गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्प ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्ये भरीव योगदान दिलेल्या चहल यांनी जलसंपदा खात्यामध्ये केलेल्या कामगिरी आधारे जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट जलसिंचन व्यवस्थापनाचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८