रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून
अलिबाग येथे जिल्हा परिषदेच्या ना.ना. पाटील सभागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते.
रायगड प्रतिनिधी : जगातील सर्वात रोमांचकारी इतिहासातील घटना म्हणजे शिवाजी राजांची आग्र्याहून सुटका.... 17 ऑगस्टला त्या घटनेला 356 वर्ष पूर्ण होत होती. आणि त्याच दिवशी रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर आणि रायगड जिल्ह्यातील निवडक गुणवंत सत्कार मूर्तीसमोर ऐतिहासिक सभागृहात मला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जागृत करता आला. तसेच आग्रा दरबारातील शिवरायांचा खिलत नाकारण्याचा रोमहर्षक प्रसंग उभा करता आला हीच गोष्ट माझ्यासाठी रोमांचकारी आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे सी. ई. ओ.डॉ. किरण पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी किती तन्मयतेनं छान व्याख्यान ऐकत होते याचा हे फोटो पुरावा आहेत.श्रोत्यांचा प्रतिसाद तर उत्तम.. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सुपुत्र परेश ठाकूर यांनीही श्रोत्यांमध्ये पहिल्या रांगेत बसून समरसतेने व्याख्यान ऐकले.अलिबाग दौर्यात प्रवासात सोबतीला खालापूरचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी ओमकार आणि सारथी अक्षय हे होते.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८