मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासना विभागाचे सचिव परिमल सिंग, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते.
मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच विविध विभागांच्या समन्वयाची आवश्यकता आहे. विशेष करून शालेय शिक्षण विभागाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. शालेय जीवनातच मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली तर तंबाखूच्या व्यसनांपासून मुले दूर राहतील. शालेय शिक्षण विभागाने यासाठी कृती आराखडा आखून काम करावे.
बैठकीच्या सुरुवातीला डॉ. व्यास यांनी कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.बैठकीस सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार, अवर सचिव तानाजी सरावणे उपस्थित होते.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८