मंत्री महाजन म्हणाले की राज्यात 155 क्रीडा संकुले आहेत. त्यांचा योग्य वापर आणि क्रीडापटूंना त्याचा लाभ मिळावा यासंदर्भात पाहणी करण्यात यावी. प्रगतीपथावरील 122 क्रीडा संकुलांच्या बांधकामास गती द्यावी. नवीन क्रीडा संकुल निर्मितीकरिता शासनाने निश्चित केलेल्या अनुदानानुसार प्रशासकीय मान्यता द्यावी. बहुउद्देशीय सभागृह मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच शासकीय अनुदान मर्यादेबाहेर आलेले प्रस्ताव तपासून त्यामध्ये कोणत्या सुविधा खेळाडूंसाठी प्रस्तावित आहेत हे तपासून अनुदान मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील आझाद मैदान क्रॉस मैदान ओव्हल मैदान कुपरेज, महाराष्ट्र लॉन टेनिस, मुंबई हॉकी असोसिएशन वानखेडे मैदान या मैदानांसह क्रीडा विभागाच्या जागांवर कार्यरत असणाऱ्या संस्थांसोबत जमिनीचा भाडेतत्वावरील करार करताना शासकीय खेळाडूंना सुविधा तसेच वेळ देण्यासंदर्भात नियम करण्यात यावेत.