स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली नवी मुंबई मनपाचा करोडोंचा घोटाळा झालेल्या कामांच्या चौकशीसाठी ई डी (ED) विभागाला देणार निवेदन
गतवर्षी झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करोडोंचा घोटाळा झाला असल्याची बाब निदर्शनास आली होती.त्यानंतर त्यात सुधारणा होणे गरजेचे असतांना पुन्हा या वर्षी होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याची बाब समोर आली आहे.यावर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर सह संबंधित अधिकारीही गप्प असल्याने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ई डी (ED) विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी दिली.
ठाणे - बेलापूर रोड (टी बी आर) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर येत असून जी कामे अगोदरच झाली आहेत त्याचे टेंडर मात्र आता काढण्यात येत आहे.(टी बी आर) विभागाअंतर्गत येणाऱ्या तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली अश्या पाच रेल्वे स्टेशनवर काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वी ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२/- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.सदरील टेंडर हे रद्द करून इतर टेंडर काढू नये असे लेखी निवेदन १६ मार्च २०२३ रोजी मनपा आयुक्त व शहर अभियंता यांना देण्यात आले.यावर झालेल्या टेंडर ची चौकशी करण्याऐवजी पुन्हा २०/०३/२०२३ रोजी तुर्भे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी २९,१४,९७२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले,घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी २५,९७,९७६ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले तर कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.
अत्यंत घाईघाईत हे टेंडर काढण्यात आले असून ते भरण्यासाठी आणि उघडण्यासाठी फक्त सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.सूचना देऊनही (TBR) विभागात मोठ्या प्रमाणात करोडोंचे टेंडर काढण्यात येत असल्याने अधिकारी व ठेकेदार हे कोणालाच जुमानत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे.सामान्य नागरिकांचा कररूपी मिळणारा पैसा जर अधिकारी व ठेकेदार लुटून खात असतील तर कश्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण हवे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.
यामुळेच (टी बी आर) विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांना तत्काळ निलंबित करून झालेल्या कामाची चौकशी करून करोडोंचे बिनकामी टेंडर तत्काळ रद्द करावे अशी मागणी योगेश महाजन यांनी केली आहे.त्याचबरोबर ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणारा करोडोंचा भ्रष्टाचार पाहता आतापर्यंत झालेल्या सर्व ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या कामांची ई डी (ED) विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महाजन यांनी व्यक्त केली आहे.