मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
मुंबई प्रतिनिधी : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे दरमहा तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ११७ बी.डी.डी. चाळ पहिला मजला वरळी मुंबई ४०००१८ येथे उपलब्ध आहे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे.
न्याय प्रवीष्ट प्रकरणे विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या न जोडलेला प्रतीचे अर्ज. सेवा विषयक आस्थापनाविषयक बाबी, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल, तर अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे मुंबई शहरचे महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.