सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील जाळपोळ हिंसाचारामागे सत्ताधारीच असण्याची शंका..
अंतरवाली-सराटी प्रतिनिधी : जाळपोळ उद्रेक कोण करतेय याबाबत शंका वाटतेय. बहुतेक असा अंदाज आहे की सत्ताधाऱ्यांतीलच लोकं त्यांची घरे जाणूनबुजून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाताने जाळून घेत आहेत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात आज लावत आहेत. ही माझी शंका 100% खरी ठरणार आहे. मी त्याचा शोध घ्यायला लावतोय. मात्र कुणी कितीही प्रयत्न केला तरी हे आंदोलन चिघळू शकत नाही. हिसंक आंदोलन करणारे सर्व सामान्य मराठा आंदोलक असतील असे वाटत नाही.हे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे.
मराठा समाजाला जाहीर आवाहन-शांततेत आंदोलन करावे.जे कुणी हिंसाचार जाळपोळ घडवून आणत आहेत त्यापासून दूर राहावे! आपल्याला कुणाच्या घरावर जायचे नाही.सत्ताधारी-विरोधक कुणीही असा मराठा समाजाचा जातीचा अभिमान बाळगा.तिसऱ्या-चौथ्या टप्प्यात सरकार नक्की ताळ्यावर येणार. धीर धरा.सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा नाहीतर पुढचे आंदोलन सरकारला जड जाईल.आंदोलन भरकटलेले नाही शिंदेंनी सत्तेतील वाचाळवीरांना आवरावे.