कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली पालिकेतील विविध विभागातील सुमारे १०-अधिकारी महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील पोलिसांचे विशेष चौकशी पथक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि प्राप्तिकर विभाग यांच्या रडारवर आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.बेकायदा इमारतींची पाठराखण नियमबाह्य इमारत बांधकाम आराखडे मंजुरी आणि महारेरा-६५ बेकायदा इमारत प्रकरणात हे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता तपास यंत्रणांमधील उच्चपदस्थ सुत्रांनी व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील एक वाद्गग्रस्त अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून थोडक्यात बचावला.या अधिकाऱ्याच्या मागावर तीन चौकशी यंत्रणा असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्राने दिली. महारेराकडून नोंदणी क्रमांक घेऊन त्या आधारे डोंबिवलीत बेकायदा इमारती उभ्या करणाऱ्या ६५-भूमाफियांची पाठराखण करणारे प्रभाग स्तरावरील पाच ते सहा साहाय्यक आयुक्त हे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाच्या रडारवर आहेत.