१)सर्वात महत्त्वाचे आहे गावांमधील सूचनाफलक
➡️सर्वसाधारण ग्रामसभा सात दिवस अगोदर नोटीस लावणे
➡️विशेष ग्रामसभा चार दिवस अगोदर नोटीस लावणे
➡️ज्या सर्वसाधारण ग्रामपंचायत आहे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रात अतिरिक्त त्यांच्या बाबतीत ही तरतूद आहे
➡️ज्या ग्रामपंचायती पेसा ग्रामपंचायती आहे
➡️त्या ग्रामपंचायत मध्ये पंधरा दिवस अगोदर सूचनाफलकावर नोटीस लावणे बंधनकारक आहे
➡️मासिक मीटिंग चार दिवस अगोदर नोटीस लावले
२) गावामध्ये जो काही निधी आलेला असतो त्या निधीमधून जी काही कामे झालेली आहेत त्याबाबतीतला जो काही सहा महिन्यातला लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडायचा असतो
▶️ त्याची प्रतसुद्धा गावाच्या सूचना फलकावर लावायची असते
▶️ सरपंच व ग्रामसेवक यांची ती जबाबदारी आहे
▶️ गावामध्ये जो काही विकास आराखडा तयार झाला आहे
▶️ त्या विकास आराखड्याची प्रतसुद्धा ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर लावणे बंधनकारक आहे
▶️ गावामध्ये जे काही विकास कामे सुरू असतात
▶️ गावामध्ये जी कामे ठेकेदाराला मिळाली असतात त्यांची सुद्धा जबाबदारी आहे विकास कामाचे सूचना फलक त्या ठिकाणी लावणे
▶️ त्या सूचना फलकावर काय-काय बाबी हव्या आहेत
▶️ कोणता ठेकेदार काम करत आहे त्या ठेकेदाराची माहिती पाहिजे काम किती रकमेचे आहे
▶️ काम किती दिवसात पूर्ण करायचा आहे तो कालावधी
▶️ त्याचबरोबर कामाची मदत म्हणजेच त्या कामाची जबाबदारी त्या ठेकेदाराची किती वर्ष आहे
▶️ सरपंच ग्रामसेवक व त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे असे फलक लावणे बाबत पण असे फलक आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतच्या कामाची ठिकाणी पाहायला मिळत नाही
▶️ त्या मागचा हेतू असेल सर्वसामान्य जनतेला माहिती मिळायला नको
▶️ विकास कामाच्या ठिकाणी नागरिकांनी त्या सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांच्याकडून ते फलक लावून घेतले पाहिजे त्या नागरिकांची ही जबाबदारी आहे
▶️ जर असे फलक लावले जात नसेल ग्रामस्थांनी तो फलक त्या ठेकेदाराला सरपंच ग्रामसेवक यांना लावण्यासाठी भाग पाडणे
▶️ सरपंच ग्रामसेवक यांचे कर्तव्य आहे गावामध्ये ज्या समित्या आहेत
⚫ त्या समित्या ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लावल्या पाहिजे
⚫ पाणीपुरवठा समिती आरोग्य समिती
⚫ शिक्षण समिती दारूबंदी समिती
⚫ समाज कल्याण समिती जैवविविधता समिती
⚫ स्वच्छता समिती सामाजिक लेखा परीक्षण समिती
⚫ कृती गट याचबरोबर इतर ज्या समित्या असतील.या सर्व समित्यांचे फलक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे
➡️सेवा हमी कायद्या अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत ज्या सेवा पुरवल्या जातात तो दर्शविणारा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे
➡️जर एकाच ग्रामसेवकांकडे अनेक ग्रामपंचायतीचा चार्ज असेल तर त्याने त्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बाबत फलक लावणे बंधनकारक आहे
➡️ग्रामसेवक त्या गावातील नागरिकांसाठी कोणत्या दिवशी उपस्थित असतील असे फलक लावणे बंधनकारक आहे
⚫ माहिती अधिकाराच्या अंतर्गत जे काही कलम ४ ख १ ते १७ सतरा बाबी स्वयंप्रेरणेने प्रकाशित करणे
➡️ग्रामसेवक यांनी त्या कार्यालयामध्ये जन माहिती अधिकारी त्यांचा संपर्क पत्ता व प्रथम अभिनय अधिकारी त्यांचा संपर्क पत्ता लावणे बंधनकारक आहे
⚫ त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य असे बोर्ड लावणे
⚫ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग फ्री क्रमांक १०६४ हा लावणी बंधनकारक आहे
⚫ ग्रामसेवक यांची नैतिक जबाबदारी आहे
ग्रामसेवक यांनी आपल्या कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे ते हालचाल रजिस्टर गावातील नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी ठेवायचे आहे.ग्रामसेवक जर ग्रामपंचायत कार्यालय सोडून जर कुठे जात असेल तर त्याची नोंद त्याने त्या हालचाल रजिस्टर नोंदही नमूद करणे बंधनकारक आहे.
वरील सर्वबाबी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात आढळून येत नसतील तर आपण गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी /डेप्युटी सीओ यांच्याकडे तक्रार करू शकता.