मुंबई प्रतिनिधी : थोर समाजसुधारक बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार दिनेश चव्हाण कक्ष अधिकारी तुषार राठोड शिवाजी चव्हाण निलेश जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.
संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा अभिवादन कार्यक्रम झाला.