दहावी-बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्वाची बातमी !
तर राज्य शिक्षण मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. मात्र यामुळे अनेक गैरप्रकार समोर येत होते.ज्यामध्ये सोशल मीडियावर लिक होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून परीक्षा या भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात मोठा अडथळा येत होता.
त्यामुळेच २०२३ मध्ये परीक्षेचे दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देणे बंद करण्यात आलं होतं. मात्र त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. ते असं की, त्यांना प्रश्नपत्रिका नीट वाचण्यात वेळ मिळत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला दिले जाणारे ही दहा मिनिटात विद्यार्थ्यांना त्यांचा प्रश्नपत्रिका वाचण्याचा वेळगृहीत धरून विद्यार्थ्यांच्या निर्धारित वेळेच्या शेवटी दहा मिनिटं देण्यात येणार आहे. त्यामुळे आता फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये अकरा वाजता आणि दुपारच्या सत्रामध्ये होणाऱ्या परीक्षांना दुपारी तीन वाजता प्रश्न पत्रिकांचे वितरण आणि उत्तर पत्रिका लेखनास प्रारंभ होईल.