मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत कोकण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीस (TCS) संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने २५/११/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती (गट-ड) तथा सहसंचालक नगर रचना पुणे विभाग पुणे यांनी परीक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवारांची यादी नगर रचना संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
गुणवत्ता यादीनुसार कोकण विभागासाठी प्राधान्यक्रम दिलेल्या शिफारस पात्र उमेदवारांनी २६.०२.२०२४ नंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह सहसंचालक नगर रचना कोकण विभाग नवी मुंबई कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन सहसंचालक नगर रचना कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८