ग्रामीण जनता त्रस्त कामे रखडली वरिष्ठ अधिकार्यांनी तलाठ्यांच्या कारभाराची झाडाझडती घ्यावीच !!
आम्ही महसूल विभागातील अनागोंदी कारभाराबाबत तमाम जनतेसमोर मांडत आलेले आहोत आज आम्ही आपल्या समोर महसूलचे तलाठी तसेच सर्कल कशा पद्धतीने बोगस कामे करतात तसेच नेमणूकीच्या ठिकाणी राहत नाहीत याबाबत उलगडा करणार आहोत व जनतेचा आवाज महसूल प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत वाचक मित्रांनो नगर तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील व गावे व वाड्या वस्त्या गावांमधील बहुतांश ९० ते ९५ टक्के तलाठी हे दिलेल्या सज्जावर राहत नाही.
शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून तलाठ्यांसाठी गावाच्या ठिकाणी इमारती बांधल्यात मात्र त्या इमारती सर्व धुळखात पडल्याचे चित्र प्रत्येक गावामध्ये आपणास दिसेल आम्ही तर नगर प्रांत आणि तहसीलदार यांना आवाहन करतो की आपण एकदा या प्रकरणात लक्ष घालाच व तलाठ्यांच्या भोंगळ व मनमानी कारभाराची झाडाझडती घ्यावी तरच आपणाला सत्य माहिती कळू शकेल.सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की वरिष्ठ स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत सगळ्यांची या कारभारात मिली भगत असते त्यात सामान्य जनतेचा नाहक बळी जातो.तलाठी गावात राहत नसल्यामुळे शेतकर्यांची व नागरीकांची अनेक कामे खोळंबली जातात कारण गावचा कारभार कोतवाल जरी बघत असला तरी त्या कागदपत्रांवर तलाठी आप्पांची सही व शिक्का लागतोच यामुळे आप्पाच नाहीत थोडी वाट बघा आप्पाकडे एकच गाव नाही असे सुनावले जाते.
दरम्यान गावातील तलाठ्याने आपले काम करताना अतिशय आचूक कामे केली पाहिजेत मात्र तलाठी दुसर्या गावाला आणि त्यांच्या हाताखालचे कोतवाल सगळी कामे करतात एखाद्या गट नंबर संबंधात किंवा एखाद्या क्षेत्रासंबंधीत जर तलाठ्याकडे वारस नोंद आली तर तलाठ्याने सर्व वारसांना विश्वासात घेऊन तसेच संबंध क्षेत्राचा रीतसर पंचा समक्ष पंचनामा करून नोटीसद्वारे सर्वांना एकत्र बोलवून सदर काम करणे अभिप्रेत असते मात्र याला बगल देत तलाठी वेगळ्या दिशेने कामकाज करतात. त्यांना साथ द्यायला व सदर नोंदीचे फेरफार उतार्या वरती चढवायला मंडलाधिकारी जबाबदार असतात.एकदा का फेरफार नोंद झाली की मग सुरू होतो कोर्टाचा प्रवास.ज्या शेती मालका वर आन्याय झाला त्याला न्याय मागण्यासाठी कागदपत्राची जुळवा जुळव आणि कोर्टात फेर्या माराव्या लागतात.त्यात त्याचा वेळ तसेच मोठ्या प्रमाणात पैशाचा अपव्यय होतो.
दरम्यान तलाठी किंवा मंडल अधिकारी यांच्याकडून कोणतेही नोंदणीचे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले गेल्यास त्याचे दुष्परिणाम मात्र शेतकर्याला भोगावे लागतात.अनेक गावांमध्ये तलाठी एन.ए प्रकरण असेल कलेक्टर एन.ए येणे प्रकरण असेल यात लाखो रुपयांची माया तालुक्यातील तलाठ्यांनी जमवल्याची खात्रीलायक माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही देखील सुजाण नागरिकांना विनंती करतो की तलाठी असेल मंडलाधिकारी असेल यांनी केलेल्या चुकीच्या नोंदीच्या तक्रारी दाखल करा.
विभागीय आयुक्त नाशिक यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश काढले आहे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांत व तहसीलदार यांना मुख्यालय राहण्याबाबत यापूर्वी आदेश काढले असून स्मरणपत्र देखील काढले आहे पण या आदेशाची व स्मरणपत्राची कितपत अंमलबजावणी होती हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.आपण ही आपल्या गावातील तलाठी सज्जा मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसतील तेथील जीपीएस लोकेशन सह फोटो घ्यावेत व संबंधित तहसीलदार प्रांत कलेक्टर यांना लिखित स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात.