छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतांना निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बॅंक खाते उघडणे अनिवार्य असून त्याची माहिती आपल्या उमेदवारी अर्जासोबत देणे आवश्यक आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात आज राजकीय पक्ष प्रतिनिधींना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती सादरीकरणाद्वारे दिली. लोकसभेसाठी उमेदवारीचे निकष जोडावयाची आवश्यक कागदपत्रे उमेदवारी अर्ज दाखल करतांना पाळावयाची संहिता दाखल गुन्ह्यांच्या माहितीचे सार्वजनिकरित्या वृत्तपत्रातून करावयाचे प्रकटीकरण इ.बाबींची माहिती देण्यात आली.उमेदवाराचे छायाचित्र कसे असावे याबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८