कल्याण प्रतिनिधी : १३८ विधानसभा मतदारसंघ २३ भिवंडी या विभागांतील आंबिवली जवळ मोहोने या परिसरातील श्रीविघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदीप विद्यालय विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळेस अनेक विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी रॅलीला उत्तम प्रतिसाद दिला.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहकार्याने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक यांच्या सहभागाने मोहने कोळीवाडा प्रभाग क्रमांक १४ व १५ या विभागांमध्ये प्रत्यक्षरीत्या नागरिकांमध्ये जाऊन तसेच काही सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये जाऊन त्यांना मतदानाकरण्याचे आव्हान करण्यात आले.याला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
याप्रसंगी श्रीविघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष/ मुख्याध्यापक अनिल आर.पाटील तसेच शासनातर्फे दिगंबर वाघ आणि यशोदीप विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.