संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर कन्नड शाळेत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर शिवनगर कन्नड येथे बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात साजरी करण्यात आली.

कन्नड प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण  प्रसारक मंडळ संचलित श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर कन्नड शाळेत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात पार पडली.यात विद्यार्थ्यांनी  छान विठ्ठल रखुमाईची वेशभूषा केली तर काहींनी वारकरीची वेशभूषा केली यात रिंगण फुगडी धार्मिक गीते भजने गाऊन दिंडीचा आनंद घेतला.

   यावेळी सुरेखा डहाळे उषाताई  केवट रंजना  महाजन कविता सावळे वर्षा वाघ धनश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीविषयी माहिती दिली.यावेळी  विद्यार्थिनींनी टाळ वीणा मृदंगाच्या तालावर पावली खेळत वारीचा आनंद द्विगुणित केला.ह्या कार्यक्रमा साठी विद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  हा उपक्रम संस्थे चे अध्यक्ष साबुसिंग राठोड उपाध्यक्ष रामदास सुरडकर सचिव पांडुरंग राठोड सहसचिव संजय पुरी कोषाध्यक्ष सरलाताई सोनावणे संचालक शिवाजी वाघ मुकुंद शिंदे मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी यांच्या मार्गदर्शनात शरद महाजन संजय चौधरी मधुकर पाटील टिळकचंद राठोड सचिन अहिरराव.समाधान बागुल उन्मेष गोसावी सत्यम पुरी रामेश्वर गायके यांनी यशस्वी केला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८