गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा: l गुरुरेव परंब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः॥


संपादकीय,
गुरूभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य ह्या कलीयुगात नाही.गुरूसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे ना अनुभवाचे ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे.कोठल्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरूभक्ती इश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विलासीत आहे.कुठल्याही दैवी सिद्धीचा अंगीकार करण्यासाठीच गुरूकृपा लागते.गुरूकृपेशिवाय एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करणे म्हणजे वाट ठाऊक नसुन गंतव्यस्थानी प्रवास करण्यासारखे आहे.वणवण फिरून काहीच निष्पन्न होत नाही.

गुरूछायेत आत्म्यास अज्ञान स्पर्शही करत नाही.प्रारब्धाची कर्मफळे देह भोगत असला तरिही त्यांचे मापदंड हे गुरूच्याच हाती असतात.त्यामुळे गुरूच्या विस्मरणासारखे दुसरे महापातक नाही.गुरू हे चिरंतन आपल्या पाठीशी असून वेळोवेळी आपल्यातील गुणदोषांचे मूल्यमापन करून त्याचे यथोचित फळ देत असतात ह्यालाच अनुभूती म्हणता येईल.दिवसातून इतरत्र कुठलेच पुण्यकर्म घडले नाही तरी गुरूनाम अवश्य घ्या.गूरूंच्या शिकवणीचा अंगीकार करणे हीच गुरूसेवा होय.अक्षय तृतीया ह्या पावन योगावर ज्या प्रकल्पाचा संकल्प करू त्याचा कदापि क्षय होत नाही.ह्या मेत्यूलोकी मोठमोठाले संकल्प करण्यापेक्षा गुरूनिष्ठेचाच संकल्प आपण करू.तोच सर्वश्रेष्ठ आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८