श्री.गुरुतत्व म्हणजेच ज्ञान...

संपादकीय, गुरु पौर्णिमा

गुरुतत्व समजून घेण्यासाठी गुरूंना धारण करावे लागते.त्यांनी सांगितलेल्या मार्गांवरती चालावे लागते.गुरुवाक्य म्हणजे ब्रम्ह वाक्य.गुरु जर २+२=५ म्हणत असतील तर त्यावरती दृढ विश्वास लागतो.गुरु कधीच कोणत्याच मनुष्याची भौतिक प्रगती करत नाहीत.आणि भौतिक प्रगती साठी गुरूंजवळ कोणी जाऊ सुद्धा नये.कारण जीवनात जर गुरु साध्य झालेच तर ते पाहिलं तुमचं भौतिक जग नष्ट करून मनुष्याला एकटा पडतात.त्याचे सर्व भवपाश ते तोडतात.कारण अतीव दुःखच माणसाला परमेश्वराकडे अग्रेसर करते.या भौतिक दुःख शिवाय यातील फोल पणा मनुष्य कधीच समजू शकत नाहीत.

  गुरु धन धान्य समृद्धी आर्थिक सुबत्ता कधीच देत नाही.तसं असतं तर शीव महादेव हे कैलासा वरती चर्म धारण करून वैरागी नसते राहिले. कारण शीव म्हणजे ज्ञान शीव म्हणजे आदीगुरु.महादेव फक्त ज्ञान देऊ शकतात.ज्याच्या आधारे मनुष्य आपल्या अनेक जन्माचे प्रारब्ध तोडून मुक्त होऊ शकतो.जो पर्यंत संचित कर्म प्रारब्ध धारणा संस्कार संकल्पना गळून पडत नाहीत,जोपर्यंत स्वतःला रिकाम करून आपल्यातील निष्पाप बालक जागृत होत नाही.तोपर्यंत मनुष्य त्या परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही.

   गुरु हा मूळ स्रोत आहे जो जीवाचा त्या अनंत परमेश्वरा सोबत आपली तार जोडन देतो.आपले अनेक जन्माचे संस्कार जे आपण आपल्या DNA मधून घेऊन जन्म मृत्यू च्या फेऱ्यात अडकून आहोत ते तोडण्यासाठीच आवश्यक ज्ञान देण्याचं कार्य गुरु करतात.कर्म कशी सुधारावीत त्यासाठी मनुष्याला स्वतः अग्नीतुन प्रवास करावा लागतो.गुरु काही अंशी तो प्रवास सुखकर नक्कीच करतील परंतु चालाव आपल्यालाच लागणार आहे.गुरु प्रतीक्षण या प्रवासात आपलं रक्षण नक्कीच करतील.परंतु प्रारब्ध संपवाव आपल्यालाच लागणार आहे.

   गुरु म्हणजे ते ज्ञान आहे.जे जीवन मुक्तीच्या मार्गांवर अग्रेसर करते.गुरु मायेतून मुक्त नाही करत तर गुरु मायेमधे राहून मायेला धारण कसं कराव याचं ज्ञान आहे.गुरु तुमच्या समस्या समाप्त करण्याचं माध्यम नसून ते फक्त समस्या कोणत्या मार्गाने गेल्यास सूटतील याचा एक उत्तम दिशा निर्देशक आहे.समस्या आपल्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत.जो एका दगड रुपी जीवाला.त्याच्या ज्ञानरुपी चिनी हातोडीने प्रहार करून त्या दगडाच एका सुंदर मूर्तित रूपांतरीत करणारा कलाकार म्हणजे श्री.गुरुतत्व.ज्याने गुरूंना स्वीकारलं आणि ज्याने हे प्रहार सहन करण्यासाठी स्वतःला तयार केल तो ब्रम्हमय झाला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८