क.डों.म.पा.मुख्यालयावर धडक धरणे आंदोलन मोर्चा

महानगर सफाई कर्मचारी संघ याचा कडोंमपावर २७ गांव युनिटच्या वतीने मोर्चा...

ल्याण प्रतिनिधी विनायकव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांना आयुक्त महोदय हे झुलवत ठेवून त्यांना कोणताही न्याय देत नाही येणारे आयुक्त हे अभ्यासाच्या नावाखाली वेळ काढूपणा करतात जर अशा आयुक्तांना न्याय देता येत नसेल तर यांना नगर विकास विभाग आयुक्त म्हणून का पाठवतात आणि जिथून आपल्याला मलाई मिळेल अशा ठिकाणच्या मात्र फाईलवर हे सही  करण्यासाठी अतिशय उत्साही असतात. दुसरीकडे हा मोर्चा काढण्यासाठी आयुक्त हेच स्वतः जबाबदार असून यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही यांनी या पत्र व्यवहाराला कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्यामुळे हे आंदोलन मोर्चा काढावा लागला.

  यांनी कर्मचाऱ्यांचा २७ गावातील ४९९ कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शासनाकडून वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. २७ गावांचा प्रश्न न्यायालयात असला तरी कर्मचारी महानगरपालिकेचेच काम करत असून त्यांना महानगरपालिकेने सहभागी करून घेणं गरजेच आहे.मात्र महानगरपालिकेने यासंदर्भात प्रस्ताव शासनाला पाठविला असून शासनाकडून अंतरिम मंजुरी देण्यात आलेली नाही.या संदर्भात सातत्याने मी पाठपुरावा देखील केला आहे. आजपासून २७ गावातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आज या कर्मचाऱ्यांसोबत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी कामगारांना सहभागी करून घेत नाहीत तो पर्यंत काम बंद राहील अस देखील सांगण्यात आलं आहे

  यावेळी माजी आमदार सुभाष भोईर कॅांग्रेसचे नेते संतोष केणे मनसेचे डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण नगरसेवक मनोज घरत या संघटनेचे अध्यक्ष भारत गायकवाड यासह शिवसेनेचे कल्याण तालुका अध्यक्ष महेश पाटील कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब  या संघटनेचे अध्यक्ष भारत गायकवाड प्रमुख सल्लागार दिगंबर वाघ यांच्यासह अनेक मान्यवर सहकारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८