नगरविकास विभागामध्ये किती बनावट अधिकारी आहेत ?

कक्ष अधिकारी अ.ज्ञा.लांडगे यांची नियुक्ती आदेश व शैक्षणिक प्रमाणपत्राची चौकशी करा ?

मुंबई प्रतिनिधी : मंत्रालय येथील नगरविकास विभागामध्ये कार्यरत असलेले कक्ष अधिकारी लांडगे यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणजेच प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचे नाव माहित नाही का दुसरीकडे यांना कार्यकारी संपादक दिगंबर वाघ यांनी मागणी केलेली माहिती काय आहे हे समजलेले दिसत नाही म्हणून यांनी अति हुशारी करून आणि आपली या कार्यालयात कशाप्रकारे हुकूमशाही चालते हे दाखवून दिले आहेत.यांना जर या कायद्याची माहिती नसेल तर यांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहेत हे जर एका संपादकाला किंवा पत्रकारांना अशाप्रकारे चुकीचा पत्रव्यवहार करून दिशाभूल करीत असेल तर यांच्यावर कुणाचा अंकुश  नाही का असा प्रश्न आता विचारला जात आहेत. 

     नगरविकास विभागाचे काम आहेत की महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कायद्याच्या चौकटीत बसून काम करून घेणे परंतु येथील अधिकारी कर्मचारी लांडगे सारखे चुकीच्या पद्धतीने काम करून एका जबाबदार व्यक्तीची दिशाभूल करीत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे उत्तरे देत असेल त्याचा विचार न केलेला बरा.विशेष म्हणजे या विभागाचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असून यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत तसेच प्रधान सचिव यांनी लांडगे सारख्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी तसेच यांची नियुक्ती ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या सारखी बनावट आणि बोगस आहेत ? याची चौकशी तात्काळ करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. 

   नगरविकास विभागामध्ये अशा प्रकारचे आणखी किती अधिकारी कार्यरत आहेत याचीही चौकशी व्हावी दुसरी बाब म्हणजे अशा अधिकाऱ्यांना शासनाने पोसण्यापेक्षा यांची शासकीय सेवेतून तात्काळ हकालपट्टी करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्याची गरज आहेत.

त्यावर असे पत्र देण्यात आले...

ही माहिती मागितली होती.  

१)आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका इतर कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकारी /कर्मचारी यांना पदोन्नती देण्यासाठी ज्या विद्यापीठांच्या मान्यतेनुसार पदोन्नती दिली जाते त्या विद्यापीठांची यादी मिळणेबाबत. २) आपल्या कार्यालयाकडे पदोन्नती देण्यासाठी असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठांची यादी मिळणेबाबत. ३) एखाद्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी दिलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी आपल्याकडे समिती किंवा किती व कोणती यंत्रणा आहेत त्या यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांची यादी मिळणेबाबत.४) शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्या नियमा अंतर्गत किंवा कायद्यातील कलमा अंतर्गत परवानगी दिली जाते त्या कलम नियमाच्या छायांकित व साक्षांकित प्रति मिळणेबाबत.(कालावधी : नियम कलम लागू झाल्यापासून ते आजतागायतपर्यंत)

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८