कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि महिला अजिंक्य कुमारी गट स्पर्धा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आल्या असून या स्पर्धेत जय गावदेवी कुस्ती संकुल पिसवली तालीम मधील पैलवान कुमारी नेहा अनंता गायकवाड हिने कोकण विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहेत.
प्रथम क्रमांक पटकावलेल्या नेहाचा कल्याण पूर्व तिसगाव येथील रहिवासी असल्याने गावातील अनेक नागरिकांनी तिचे अभिनंदन केले असून नेहा ही माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांची कन्या आहेत यावेळी तिचे नातेवाईक मित्रपरिवार यांनी हिचे तोंड भरून कौतुक केले आहेत व असेच वाटचाल सदैव चालू राहो यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८