रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल....

मुबंई प्रतिनिधी भाग्यश्री रासने : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग आणि आरक्षणाच्या नियमांत मोठा बदल  केला आहे.आता रेल्वे तिकीटांची बुकिंग साठ दिवस अगोदरही करता येऊ शकणर आहे. आधी हा नियम १२० दिवसांचा होता. नवीन नियम १ नोव्हेंबर२०२४ पासून लागू होणार आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या तिकीट आरक्षणावर या नवीन बदलांचा परिणाम होणार नाही. हा निर्णय घेण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा रेल्वेने केलेला नाही.

  रेल्वेने सांगितले की १ नोव्हेंबर २०२४ पासून ॲडव्हान्स रिजर्व पिरियड दोन महिन्यांचा असेल. तिकीटांची बुकिंगही त्याच पद्धतीने करण्यात येईल. याआधीच्या १२० दिवसांच्या नियमांतर्गत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत केलेल्या सर्व बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही.सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.बऱ्याचदा रेल्वे गाड्या रद्द झाल्यास किंवा चार महिन्यांत प्रवाशांची फिरण्याची योजना रद्द झाल्यास प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.तिकीटाचे पैसे परत मिळवण्यात मोठ्या अडचणी येतात.त्यामुळे रेल्वेने एआरपीच्या या नियमांत बदल केल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

   विदेशी प्रवाशांसाठी नियमांत बदल नाही.साठ दिवसांच्या ॲडव्हान्स रिजर्व पिरिएडच्या व्यतिरिक्त अन्य बुकिंग रद्द करण्याची परवानगी देण्यात येईल.यासह ज्या रेल्वे गाड्यांचा ॲडव्हान्स पिरिएड सुरुवातीपासूनच कमी आहे त्यावरही या नियमांचा परिणाम होणार नाही. यामध्ये गोमती एक्सप्रेस, ताज एक्सप्रेस या रेल्वेंचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांत सध्या आगाऊ आरक्षणासाठी वेळेची मर्यादा आधीच लागू करण्यात आली आहे.विदेशी प्रवाशांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८