प्रदीप व्यास यांचा माहितीचा अधिकार आदर्श घोटाळा होणार ?
मुंबई प्रतिनिधी : समीर साय यांचा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यकाळ संपुष्टात आल्याने आदर्श घोटाळ्यातील संशयित प्रदीप व्यास यांची मुख्य माहिती आयुक्त पदी महाराष्ट्र शासनाने नेमणूक केली आहे.आदर्श घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांना शासनाने काही काळासाठी सेवेतून निलंबित केलेले होते.
अनेक महिन्यांच्या विलंबानंतर नियमित मुख्य आयुक्तांची नियुक्ती करण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा प्रभारी मुख्य माहिती आयुक्त पदासाठी यांच्यासारखी अयोग्य व्यक्ती शोधली असून यामुळे या कायद्याची प्रतिमा मलीन झाली आहेत.
आदर्श घोटाळ्यातील संशयित भूमिकेमुळे निलंबित झालेल्या प्रदीप व्यास यांची आता प्रभारी मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि विरोधी पक्षनेत्यांना संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त पदासाठी योग्य उमेदवार सापडले नाहीत.? त्यांनी योग्य उमेदवार शोधायचा होता की फक्त सोयीस्कर व्यक्तीची नियुक्ती करायची होती? राज्यात पारदर्शकता अजूनही खूप दूर आहे.