माहिती अधिकार अधिनियम-२००५ च्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात झाले..

पुणे प्रतिनिधी विनायकव्हाण : पुणे येथील निगडी प्राधिकरण जवळ असलेले ग.दि.माडगूळकर नाट्यगृह येथे माहिती अधिकार अधिनियम-२००५ या सुलभ आणि सोप्या दोन भाषेत असलेले पुस्तकाचे प्रकाशन १८ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहेत.या पुस्तकाच्या लेखिका रेखा साळुंखे यांनी अतिशय मेहनतीने या पुस्तकाचे लिखाण केले आहेत या प्रकाशना वेळी अनेक मित्रपरिवार नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी अनेक सहकाऱ्यांनी मित्र-मैत्रिणींनी नातेवाईकांनी लेखिका साळुंखे यांच्या शुभेच्छाचा वर्षाव केला.

  लेखिका यांचे या कायद्यासाठी मोठे योगदान असून या यशदा पुणे येथील संस्थेवर तज्ञ प्रशिक्षिका असून यांचे माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याचे जवळपास ६० हजार अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले आहेत.मानस प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या अध्यक्षा उज्वला कोंडे-देशमुख यांनी हे पुस्तक प्रकाशनासाठी मोठी मेहनत घेऊन प्रकाशनासाठी परवानगी दिली.

  या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी  शशिकांत चौधरी वरिष्ठ ग्रंथपाल यशदा पुणे दादु बुळे  संशोधन अधिकारी तथा प्रशिक्षक यशदा पुणे सुभाष बसवेकर यांच्या शुभहस्ते आणि यांच्या प्रमुख उपस्थिती विकास साळुंखे ॲड.दिगंबर वाघ ॲड.प्रदीप नाईक खंडू गव्हाणे यांच्यासह पुस्तक प्रकाशाचे उद्घाटन झाले.

  हे पुस्तक सर्वसामान्य नागरिक अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक एकदा वाचावं आपल्याला या पुस्तकाची प्रत घरपोच पाहिजे असल्यास त्यांनी या संस्थेच्या अपर्णा जाधव-७०५७३६८३८३ यांच्याकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त पुस्तकाच्या प्रति हवे असल्यास त्यासाठी आकर्षक अशी सवलत देण्यात येईल.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८