बोरिवलीच्या ६ छोट्या कराटे चॅम्पियनाना घवघवीत यश...

मुंबई प्रतिनिधीनुरागवार : बोरिवलीच्या २४ वी (एफ.एस.के.ए) विश्वचषक कराटे चॅम्पियनशिप ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान गोवा मापुसा स्टेडियम इंडिया येथे आयोजित करण्यात आली होती.सिनेमाचा सुपरस्टार हंशी डॉ.सुमन तलवार (दक्षिण फिल्मस्टार) आणि ग्रँडमास्टर केविन फुनाकोशी या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मास्टर केनेथ फुनाकोशी (FSKA चे संस्थापक) यांच्या प्रेरणेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे अध्यक्ष हसन मोहम्मद इस्माईल यांनी स्पर्धेचे संचालक हंशी जोस चागस यांच्यासह भारत आणि २३ देशांतील स्पर्धकाने यात भाग घेतला होता.

  या स्पर्धेत बोरीवलीच्या जुनी एम एच बी वसाहत येथील सुहास परब यांच्या स्पोर्ट्स मार्शल आर्ट अकॅडमीच्या ६ विध्यार्थ्यांनी भाग घेतला होता व या सर्व विद्यार्थ्यांनी हेवा वाटेल असे यश संपादन केले आहे.या ६ विध्यार्थ्याने एकूण १२ पदके मिळवली.

   ९ वर्षा खालील १) निलराज ताठे  २ सुवर्ण पदक  २) धैर्य खराडे  १ सुवर्ण  १ रौप्य ११ वर्षा खालील १) स्पृहा डोंगरीकर  १ सुवर्ण  १ रौप्य २) अर्णव रानडे  १ सुवर्ण  १ कास्य १४ वर्षा खालील  जानव्ही परब  १ सुवर्ण   १ रौप्य  १५ वर्षा खालील  केदार वैद्य   १ रौप्य  १ कास्य

   या यशस्वी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्सचा जुनी एमएचबी येथील दत्त मंदिर येथे समाजसेवक संजय परब प्रसाद परब मंदार रानडे व पत्रकार-छायाचित्रकार अनुराग पवार यांच्या हस्ते पदक ट्रॉफी व प्रशास्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मनसे उपविभाग अध्याक्षा अपेक्षा पवार यांचही विशेष सहकार्य.जगभरातील प्रशिक्षक देखील उपस्थित होते आगामी २५ वी विश्वचषक स्पर्धा पोर्तुगाल येथे २०२५ मध्ये होणार आहे.

   सुहास परब व यतीन डोंगरीकर यांच्या कुशल मार्गदर्शना खाली या ६ विद्याथ्यांनी घवघवीत यश मिळवल व भारतातर्फे खेळण्याची संधी मिळावी  व त्याना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८