दिल्ली प्रतिनिधी : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी मोठा निर्णय घेतला.केंद्र सरकारने कोकण आणि नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.याबाबत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर माहिती दिली.Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने ४६.९१ कोटींचा निधी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.तर नाशिकमधील राम काल पथकाचा विकास करण्यासाठी ९९.१४ कोटींच्या निधीची तरतूद केंद्र सरकारने केल्याचही फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर चमकण्यासाठी चालना मिळत आहे.
पुढं फडणवीस म्हणाले की Ex INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम रीफ आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन आणि नाशिकमधील राम काल पथ हे प्रकल्प ३२९५.७६ कोटी रुपयांचे आहेत. ते SASCI योजनेचा एक भाग आहेत. पर्यटनाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून झालेल्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील पर्यटनाला जागतिक दर्जापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे.यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८