इब्सार ग्रुप ऑफ कॉलेजमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आला.

कर्जत प्रतिनिधी :  ईबसार ग्रुप ऑफ कॉलेजमध्ये १७ जानेवारी २०२५ रोजी सर्व कोर्सच्या विद्यार्थींसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.या कॅम्पमध्ये नामांकित डॉक्टर नेहा महेंद्र पटेल उपस्थित होत्या या कॅम्पसाठी कॉलेजच्या प्राध्यापक मीनाक्षी मोंगा यांनी निवड केली होती.या निवडीला साजेसा असा डॉक्टर नेहा पटेल यांनी जवळ जवळ दोनशे ते अडीशे विद्यार्थ्यांना चेअर वर्कआउट एका खुर्चीच्या माध्यमातून कसा व्यायाम करता येईल याची जवळजवळ दीड ते दोन तास सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. 

      नेहा पटेल या फिजिओथेरपिस्ट या फील्डमध्ये २० वर्षापासून काम करत आहेत आणि त्या या वर्षापासून आपल्या कॉलेजमध्ये म्हणजेच ईबसार ग्रुप ऑफ कॉलेजेस मध्ये पॅरामेडिकल डिपार्टमेंटसाठी जॉईन केले होते आणि त्यासाठी त्यांनी खूप असे प्रयत्न करून विद्यार्थ्यांना चेअर वर्कआउटच्या खूप महत्त्वाच्या सोप्या पद्धती सांगितल्या व त्यांच्याकडून तसे करून घेण्यात आले.

   डॉक्टर पटेल यांनी फिजिओथेरपिस्ट मध्ये २००४ साली गोल्ड मेडल मिळाले होते तसेच स्टुडन्टचा खूप उत्साह निर्माण झाला होता कारण अतिशय उत्कृष्ट असा वर्कशॉप चेअरवर्क आऊट नेहा पटेल यांनी घेतला चेअर वर्कआउट म्हणजेच सर्व शिरा मोकळ्या होतात आणि त्यामुळे शरीराला आराम मिळतो तसेच यावेळी पॅरामेडिकल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८